मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा तांत्रिक बिघाड झाला असल्याची माहिती आहे. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव इथे जाणार होते. परंतु यादरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वीच बिघाड उघड झाला त्यामुळे पुढील अनुचित घटना टळली आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसोबत अनुचित प्रकार होण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचं दिसत आहे. दोन वर्षातील ही सहावी घटना असून यापूर्वी लातूरमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं होतं. काही महिन्यांपूर्वी कोल्हापुरात भरकटलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
COMMENTS