मुंबई – सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेल्या नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक इशारा दिला आहे. नाणार प्रकल्पाला जर असाच विरोध होत राहिला तर अखेर नाणारचा प्रकल्प गुजरातला जाईल असा इशार त्यांनी दिला आहे. नाणार प्रकल्पाला कोकणातील स्थानिक नागरिक आणि मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसह विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. या प्रकल्पाबाबत होत असलेला विरोध पाहता असाच जर विरोध राहिला तर हा प्रकल्प गुजरातला जाऊ शकतो असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान 3 लाख कोटींच्या या प्रकल्पाचा कोकणातील नागरिकांसह राज्याला फायदा होणार असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच या प्रकल्पामुळे १ लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे. परंतु या प्रकल्पामुळे कोकणातील निसर्ग आणि मासेमारीचे मोठ्याप्रमाणात नुकसान होईल असा विरोधकांचा आक्षेप आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा सूचक इशारा याविरोधाच्या पार्श्वभूमीवरच दिला असल्यामुळे या इशा-यानंतर तरी या प्रकल्पाबाबतचा विरोध थांबणार आहे का याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS