मुंबई – भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबीयांनी शिवसेनेत प्रवेश आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून मला वाटतं वनगा कुटुंबीयांचा गैरसमज झाला असावा. स्वर्गीय चिंतामण वनगा भाजपचे वरिष्ठ नेते होते. पक्ष वाढीत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी पक्ष वाढीसाठी मोठा संघर्ष केला असून त्यांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती आहे. या निवडणुकीत त्यांच्या कुटुंबियांनाच तिकीट देण्याचा विचार सुरू होता. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
तसेच यबाबत स्वतः 27 किंवा 28 तारखेला उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो होतो. अशा परिस्थितीत पोटनिवडणूक लढत नाही अशी उद्धव यांनी भूमिका मांडली होती. तसेच मी त्यांना मदत करा असं आवाहन केलं होतं. त्यांनी सुभास देसाई तुमच्याशी चर्चा करतील असं सांगितलं होतं. त्यानंतर अचानक वनगा कुटुंबियांनी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून टीव्हीवर पाहिलं.
दरम्यान स्थानिक पातळीवर पक्षाचे नेते वनगा कुटुंबियांच्या संपर्कात होते. कदाचित स्थानिक राजकारण असावं तुमचा कुणी विचार करीत नाहीये असा वनगा कुटुंबियांना समज करून दिला असावा असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
COMMENTS