मुंबई – रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन प्रकाश मेहतांना अखेर काढण्यात आलं आहे. प्रकाश मेहतांच्या ठिकाणी रविंद्र चव्हाण यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश मेहतांची उचलबांगडी अनेक कारणांवरुन करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.
प्रकाश मेहतांची उचलबांगडी केल्याची कारणे
मेहता यांच्या कार्यप्रणालीवर रायगडमध्ये नाराजी होती
कर्जत येथे नुकत्याच झालेल्या भाजप मेळाव्याला दांडी मारली होती
ध्वजारोहण सोहळ्यालाही तीन वेळा ते अनुपस्थित राहिले होते
सहा सहा महिने जिल्ह्यात फिरकत नव्हते
भाजप कार्यकर्तेही नाराज होते
तीन वर्षात पक्षवाढीसाठी प्रयत्न केले नाही
शेकापसारख्या विरोधी पक्षाशी जवळीक असल्याने पक्षकार्यकर्त्यांची कुचंबणा होत होती
सावित्री पूल दुर्घटना वेळी सेल्फी प्रकरण गाजलं होतं
या सर्व कारणांमुळे प्रकाश मेहतांची उचलबांगडी केली जात असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS