राज्यातील ग्रामीण भाग हागणदारीमुक्त – मुख्यमंत्री

राज्यातील ग्रामीण भाग हागणदारीमुक्त – मुख्यमंत्री

मुंबई –आज महाराष्ट्रात ग्रामीण भाग हागणदारीमुक्त झाले असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच  2012 मध्ये एक बेसलाईन सर्वे झाला असून त्यामध्ये देशात 50 टक्के ग्रामीण भागांत शौचालय नसल्याची माहिती समोर आली होती असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच लोक उघड्यावर शौचास जातात म्हणून पंतप्रधान मोदी यांनी oct 2019 पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचे निश्चित केले असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. राज्यात स्वच्छ महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत हे आव्हान स्वीकारले असून  55 टक्के ग्रामीण भागांत शौचालय नव्हती असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान 34 जिल्ह्यांमधील, 351 तालुके, 27, 667 ग्रामपंचायत, 40, 500 गावे ही हागणदारी मुक्त करण्याचं ठरवलं असल्याचंही ते म्हणाले आहेत. आज महाराष्ट्रात ग्रामीण भाग हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा करत आहोत. देशांत जेवढे शौचालय बांधली होती तेवढी कोणत्याच राज्याने बांधली नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारने 4,500 कोटी रुपये यांवर खर्च केले असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

COMMENTS