मुंबई – अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या रेलरोको आंदोलनावरुन सभागृहात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलनकर्त्यांवर करण्यात आलेल्या लाठी चार्जवरुन विरोधकांनी चांगलाच गदारोळ करत सत्ताधारी भाजपाला प्रश्न विचारले आहेत. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: उत्तर दिले असून आंदोलनकर्त्यांनी लोकलवर दगडफेक केल्यामुळं त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला होता. यामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे.
दरम्यान रेल्वे भरतीतल्या गोंधळामुळे अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला होता. दादर-माटुंग्या दरम्यान रेल रोको केला होता. या रेल रोकोमुळे कामावर जाणा-या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. याची दखल घेत रेल्वेने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. परंतु सध्या रेल्वे आणि अंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा सूरु असून त्यांनी केलेली 100% नोकरीची मागणी शक्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसं केल्यास अन्य शिक्षित तरुणावर अन्याय होईल त्यामुळे त्यांच्यासाठी 20 % जागा राखीव ठेवल्या असून यावर लवकरच तोडगा काढण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे..
COMMENTS