मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित शुभेच्छा देण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय नेत्यांनी आज गर्दी केली आहे. यामध्ये विरोधी पक्षातीलही काही नेते सह्याद्री अतिथीगृहावर गेले असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. माण खटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे, अमरावतीच्या खासदार नवनित राणा आणि त्यांचे पती रवी राणा, तसेच शिवसेनेचे अणुशक्तीनगरचेआमदार तुकाराम काते यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान कालच राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ‘जो येईल त्याचं स्वागत केलं जाईल, सत्तेसाठी 15 टक्के बाहेरचे घेतो’ असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते त्यानंतर आज इच्छूकांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गर्दी केली असल्याची चर्चा सुरु आहे.
COMMENTS