एकनाथ खडसेंचं पुनर्वसन अशक्य – मुख्यमंत्री

एकनाथ खडसेंचं पुनर्वसन अशक्य – मुख्यमंत्री

नागपूर – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ते सध्या मंत्रिमंडळातून बाहेर आहेत. त्यामुळे ते नाराज असून एकनाथ खडसेंच्या या नाराजीबाबत बोलताना एकनाथ खडसेंचं पुनर्वसन अशक्य असल्याचं  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन अशक्य आहे कारण पुनर्वसन विस्थापितांचे होते. नाथाभाऊ हे प्रस्थापित नेते आहेत, राजकारणातील त्यांचा अनुभव दांडगा आहे. अशी लोक पक्षासाठी अमूल्य असतात असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

तसेच गुजरातमध्ये भाजपला मिळालेल्या विजयानंतर महाराष्ट्रात आम्ही अजून स्थिर झालो असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच सातत्याने महाराष्ट्रात भाजप पहिल्या नंबरचा पक्ष झाला असून 2016 पासून निवडणुकांत आम्हाला यश मिळत आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप पक्ष मजबूत होत असून इतर पक्षांकडे जाण्याची मानसिकताच नसल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

COMMENTS