मुंबई – आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन मतदारसंघातून लढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मुख्यमंत्री नागपूर दक्षिण-पश्चिमसह मुंबईतील मलबार हिल किंवा मुलुंड या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोललं जात होतं. विदर्भाऐवजी महाराष्ट्राचा नेता अशी छबी निर्माण करण्याचा यावरुन प्रयत्न सुरु असल्याची चर्चा होती. परंतु फक्त एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान मुंबईतील मलबार हिल हा मतदारसंघ सुरक्षित मानला जात आहे. कारण मतदारसंघाचं नेतृत्व सध्या मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा करत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी मुंबईतील मतदारसंघाचीही चाचपणी सुरु करण्यात आली असल्याची चर्चा होती. मात्र अशा परिस्थितीत मंगल प्रभात लोढा यांचं पुनर्वसन कुठे करावं असा प्रश्न भाजपला पडला होता.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या पारंपारिक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला अस्याची चर्चा आहे.
COMMENTS