मुख्यमंत्र्यांचा शरद पवार आणि अजित पवारांना फोन !

मुख्यमंत्र्यांचा शरद पवार आणि अजित पवारांना फोन !

पुणे – पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं असून या महापुरात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक गाड्या वाहून गेल्या असल्याची माहिती आहे.बारामती जिल्ह्यात तर कऱ्हा आणि निरा या दोन्ही नद्यांना महापूर आल्यामुळे शेकडो कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. पुरंदर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नाझरे धरणातून मोठ्याप्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने बारामतीत कऱ्हा नदीला पूर आला आहे. त्यामुळे याठिकाणचे नागरिक भयभीत झाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली आहे. बारामतीत झालेल्या पावसावर शरद पवार यांच्याळी फोनवर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान याबाबत अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली असून शेतीचं, घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, जीवितहानीही झाली आहे, मात्र त्याची दाहकता अद्याप समोर आलं नाही, निरा आणि कऱ्हा दोन्ही नद्यांना पाणी आल्याने काळजी घेणं आवश्यक आहे. पाण्याचा निचरा होणं आवश्यक आहे, दुपारपर्यंत पाण्याचा निचरा होईल, त्यानंतर परिस्थिती पूर्ववत होईल, नागरिकांनी घाबरु नये असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS