सांगली – विरोधकांनी पूरस्थितीचं राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन लोकांना मदत करावी. सरकारच्या उणिवा दाखवून द्या पण राजकारण करू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांना केलं आहे. आपल्याला राजकारण करण्यासाठी बराच वेळ आहे. सध्या राजकारण करण्याची ही योग्य वेळ नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर आणि सांगलीत यावर्षी विक्रमी पाऊस झाला. पूरस्थिती इतकी भीषण होती की तिथे जाणे कुणालाही शक्य नव्हते. अशाही परिस्थितीत गिरीश महाजन त्या ठिकाणी गेले. त्यांनी पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. त्यांनी कोणताही सेल्फी घेतला नाही. बोटीमधून सोडायला येणाऱ्यांना त्यांनी हात दिला होता. ते फुटेज एडिट करुन गैरवापर करण्यात आला असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. आज सांगलीमधील पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते
दरम्यान २००५ च्या तुलनेत कोल्हापूर आणि सांगलीमध्ये तीन पट पाऊस पडला आहे.
तसेच मुसळधार पाऊस, कोयनेतील विसर्गामुळे पूरग्रस्तस्थिती निर्माण झाली. सांगली आणि कोल्हापूरमधील जनजीवन पूर्वरत करण्यावर सध्या सरकारने भर दिला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. सांगलीत ९ दिवसांमध्ये ७५८ टक्के पाऊस पडला आहे. तर कोल्हापूरात ९ दिवसांत ४८० टक्के पाऊस, ९ दिवसांमध्ये कोयना धरण ५० टक्के भरलं, कोयना धरनातून मोठा विसर्ग सुरु आहे.
३१ दिवसाचा पाऊस नऊ दिवसांत पडला.
विक्रमी पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती झाली
अनेक राज्यातून बचावपथकं दाखल झाली आहेत. तसेच एनडीआरएफच्या टीमद्वारे युद्धपातळीवर मदत केली जात असून सांगलीत एकूण ९५ बोटीद्वारे बचावकार्य सुरू आहे. तर शिरोळ तालुक्यात आणखी लोक अडकले आहेत. २७ हजार हेक्टर जमिनीवर पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. तसेच सांगली आणि कोल्हापूरमधून जवळजवळ साडेतीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच ब्रह्मनाळमध्ये बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत १२ मृत्युमुखी, ८ बेपत्ता, दोन जखमी झाले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
Interacting with media as I visited some area in Sangli and met citizens to reviews the situation and inspect the rescue operations https://t.co/kvlgziEHVD
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 10, 2019
COMMENTS