एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा!

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा!

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिलेल्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. एमआयडीसीचा भूखंड हडपल्याचा आरोपाची चौकशी करा तोपर्यंत मी राजीनामा देतो, असं स्वत: मला नाथाभाऊंनी सांगितलं होतं, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

दरम्यान एमआयडीसीचा भूखंड हडपल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंवर विरोधकांनी केला होता. यामुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता. विरोधकांच्या आरोपावर त्यावेळी मी आणि नाथाभाऊंनी त्यांना उत्तरं दिली. खडसे मला येऊन भेटले आणि तुम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा तोपर्यंत मी राजीनामा देतो, असं ते स्वत: मला बोलले होते. असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.विचारपूर्वक निर्णय घ्या असंही मी त्यावेळी खडसेंना सांगितलं होतं, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS