एकनाथ खडसेंबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत!

एकनाथ खडसेंबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत!

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळेच संकेत दिले आहेत.एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते असून त्यांना राज्यात ठेवायचे का? केंद्रात पाठवायचे? याबाबतचा निर्णय केंद्रीय नेते घेतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात एकनाथ खडसे यांना केंद्रात पाठवलं जाऊ शकतं असं बोललं जात आहे. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भुसावळ येथे येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरुन एकनाथ खडसेंना राज्यसभेवर घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपाच्या केंद्रीय नेत्यांकडून केला जाऊ शकतो असं बोललं जात आहे. तसेच राज्यातील विधानसभा निवडणुकांवेळी खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे रोहिणी खडसेंना विधानसभेचं तिकीट देऊन खडसेंची नाराजी चांगलीच दूर करण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. परंतु मी पक्षाकडे विधानसभेलाच उमेदवारीची मागणी करणार आहे, असं एकनाथ खडसेंनी यापूर्वी म्हटलं आहे. यावरुन, खडसे राज्यातच राहण्यास उत्सुक असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता भाजपचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS