मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या हेलिकॉप्टरचं नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हेलिकॉप्टरमध्ये मर्यादेपेक्षा जास्त वजन असल्यानं हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती मिळतेय. मुख्यमंत्री नाशिकहून औरंगाबादला जात असताना ही घटना घडली आहे.

हेलिकॉप्टरनं उड्डाण केल्यानंतर काही वेळातच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि काही सचिवही होते.त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये सामानाचं वजन जास्त झाल्यानं पायलटनं तात्काळ विमान हेलिपॅडवर उतरवल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर हेलिकॉप्टरमधून एका सचिवाला खाली उतरवण्यात आलं आणि हेलिकॉप्टर औरंगाबदच्या दिशेनं रवाना झालं.

दरम्यान, यापूर्वी 25 मे 2017 रोजी लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर खाली कोसळलं होतं. तर दुसऱ्यांदा रायगडमध्येही ते हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले होते. त्यानंतर पुन्हा ही घटना घडल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

COMMENTS