‘या’ उदाहरणाचा कोणत्याही सदस्यांशी संबंध नाही, मुख्यमंत्र्यांनी उडवली विरोधकांची खिल्ली !

‘या’ उदाहरणाचा कोणत्याही सदस्यांशी संबंध नाही, मुख्यमंत्र्यांनी उडवली विरोधकांची खिल्ली !

मुंबई – संख्यावाचनाबाबत तज्ज्ञांची समिती नेमून विचार करणार असल्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. संख्यावाचनाबाबत तज्ञ्जांची समितीने शिफारस केली होती. त्यानुसार हे अभ्यासक्रमात घेण्यात आले आहेत. ते केवळ वीस दोन असे नसून पुढे बावीसही लिहिलेले आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यावर सभागृहाची तीव्र भावना असेल तर अधिक तज्ज्ञांची समिती नेमून त्याबाबत विचार करू असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान बालभारतीने इयत्ता दुसरीच्या पुस्तकात शैक्षणिक 2019-20 या वर्षापासून महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलानुसार विद्यार्थी आता संख्यावाचन करताना, अठ्ठावीस ऐवजी वीस आठ, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, बत्तीस ऐवजी तीन दोन अशी नवी पद्धत अमलात आणली आहे. यावरुन काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारची खिल्ली उडवली होती. आता मोबाईल नंबर कसा बोलायचा 9892 कसं म्हणायचं.. 90 वर 8, 90 वर 2, अहो हे काय चाललंय..? भावी पिढीचं नुकसान, वाटोळं करतोय. आता मंत्री बावनकुळे कसं म्हणायचं?
50 वर 2 कुळे असं म्हणायचं ???
विसपुते… यांना 20 वर शून्य पुते??? फडणवीस यांना फडण 20 वर शून्य…या अशी हाक मारायची का आम्ही? असा सवाल अजित पवार यांनी केला होता.

त्यानंतर आज संख्यावाचनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची खिल्ली उडवली आहे. बोलण्यात सुलभता यावी म्हणून संख्यावाचनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
– दादा कमळ बघ
– छगन कमळ बघ
– हसन झटकन उठ
– शरद गवत आण
पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकात हे उतारे आहेत. या उदाहरणाचा कोणत्याही सदस्यांशी संबंध येत नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS