बीड – मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडेंचा काढता पाय !

बीड – मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडेंचा काढता पाय !

बीड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बीडच्या दौ-यावर आहेत. दुष्काळाची पाहणी आणि प्रशासकीय आढावा घेण्यासाठी ते बीडमध्ये दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते. यावेळी  विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. परंतु काही वेळातच मुंडे हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून बाहेर पडले असल्याचं पहावयास मिळालं.

दरम्यान बाहेर पडल्यानंतर मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘बीडमधील दुष्काळ परिस्थिती, शेतकऱ्यांची स्थिती पाहता जनावरांसाठी चारा छावणी, पाण्यासाठी विहिरींची परवानगी अशा गोष्टींसाठी तातडीने मदत करणे गरजेचं आहे. परंतु बैठकांवर बैठका हे काही आम्हाला मान्य नाही, दुष्काळावर मात करण्यासाठी तातडीने मदत आणि उपाय योजनांची गरज आहे. ते काम प्रशासनाचं आहे. त्यामुळे आम्ही निवेदन देऊन बाहेर पडलो. असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

खरीप-रब्बी पिकांचे नुकसान मोठे आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या उपाययोजना करण्यासाठी सरकारने तिजोरी रिकामी करावी तसेच खरीप आणि रब्बीच्या पीकं नुकसान पोटी शेतकऱ्यांना पन्नास हजार मदत द्या. तसेच टंचाई आराखडे आज टँकर मंजुरी दिली जात नाही, बोअर विहीर अधिग्रहण केलं जातं नाही, कुठं ही पाणी नाही.

तसेच बोंड अळीचं वाटप झालेलं नसून खोटी माहिती दिली जात आहे. तुम्ही 37400 रुपये 30400 प्रति हेक्टरी अशी घोषणा केली होती ते वाटप झाले पाहिजे. विम्याचे पैसे खात्यावर अजूनही जमा झालेले  नाहीत. कर्जमाफी पूर्णपणे मिळू शकली नाही. या सर्व विषयावर आपण लेखी निवेदन दिले असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

 

COMMENTS