कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळा, महाविद्यालये बंद!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळा, महाविद्यालये बंद!

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याची घो‍षणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच आज मध्यरात्रीपासून मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरातील सिनेमागृह, नाट्यगृह, जिम, जलतरण तलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे शाळा आणि मगाविद्यालये बंद राहणार
आहेत. परंतु इतर शहरातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच मॉल्स सुरू राहणार, मात्र तिथे गर्दी करू नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

तसेच दहावी आणि बारावीची परीक्षा वगळता पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. खासगी शाळा काही ठिकाणी स्वत:हून बंद करत आहेत. लोकांच्या मनात भीती निर्माण होऊ नये ही आपली जबाबदारी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, राज्यातील कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या 17 झाली आहे. 12 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत 1295 विमानांमधील 1 लाख 48 हजार 706 प्रवासी तपासण्यात आले आहेत.

COMMENTS