धुळे – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचं पक्षामध्ये वजन वाढलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर आणखी एक जबाबदारी सोपवली आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या धुळे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची सर्व जबाबदारी महाजनांवर सोपवली आहे.त्यामुळे जळगाव महानगरपालिका निवडणुकीतील घवघवीत यशानंतर महाजन यांचं पक्षात वजन वाढलं असल्याचं दिसत आहे.
दरम्यान केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि आमदार अनिल गोटे यांच्यात राजकीय कलह सुरू आहे. पक्षाआंतर्गत सुरु असलेले गतातटाच्या राजकारणामुळे पक्षासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. तसेच धुळे महापालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणी करावे? यावरून गोटे आणि भामरे गटात वाद सुरु आहे. त्यामुळे या वादावर मुख्यमंत्र्यांनी महाजन यांच्या रुपाने रामबाण उपाय शोधला असल्याची चर्चा आहे.
दरम्यान धुळे पालिकेत सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची तर जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे महाजन यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्ता खेचून घेण्यात यश येणार का याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS