औरंगाबाद – राज्यातील एकही व्यक्ती आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. औरंगाबादमधील लासूर स्टेशन याठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.
राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्यदायी जीवन देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी शासनानं अनेक योजना आमलात आणल्या आहेत. तसेच ही आरोग्य सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी शासनाचा प्रयत्न असल्याचंही त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. भाजपच्यावतीने आयोजित केलेल्या या महाशिबीरात अनेक नागरिकांना मोफत आरोग्य उपचार देण्यात आले आहेत.
लासूर स्टेशन या महाआरोग्य शिबिराच्या समारोपाचा कार्यक्रम आयोजिक करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते. त्यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या आरोग्य शिबीर कार्यक्रमाचही कौतुक केलं.
एकही व्यक्ती आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही, आरोग्यदायी जीवन देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध-लासूर स्टेशन येथे आयोजित #महाआरोग्य शिबिर समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची ग्वाही.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री @girishdmahajan आदी उपस्थित pic.twitter.com/O9QZ2gt4xM
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 9, 2017
COMMENTS