मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचं सूचक वक्तव्य, 1 डिसेंबरला जल्लोष करा !

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचं सूचक वक्तव्य, 1 डिसेंबरला जल्लोष करा !

शिर्डी – मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. येत्या पंधरा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देऊ. त्यामुळे 1 डिसेंबरला मराठा समाजाने आंदोलन करण्यापेक्षा जल्लोष करण्यासाठी तयार राहा असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर येथे बोलताना केलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही सादर केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. हे आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला मात्र धक्का लागणार नसल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज मराठा आरक्षणबाबतचा अहवाल मागासवर्गीय आयोगानं सादर केला आहे.  मुख्य सचिव डी. के. जैन यांच्याकडे हा अहवाल सादर करण्यात आला आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला प्राप्त झाला असून यावर अभ्यास करुन पुढील पाऊलं उचललं जाईल अशी प्रतिक्रिया जैन यांनी दिली आहे. हा अहवाल आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अहवाल स्वीकारल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी विधिमंडळात मांडला जाणार आहे.

या अहवालामध्ये मराठा समाजाला स्वतंत्रपणे १६ टक्के आरक्षण देण्याची शिफारस असल्याची चर्चा आहे. या अहवालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलं असून येत्या 1 डिसेंबरला मराठा समाजानं जल्लोषासाठी तयार रहावे असं ते म्हणाले आहेत.

COMMENTS