मुंबई – खासदार नारायण राणे हे १ सप्टेंबरला आपला पक्ष भाजपात विलीन करणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपुर्वी नारायण राणे यांनी आपण १० दिवसांत मोठा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. परंतु शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय नारायण राणेंच्या पक्षाचं विलिनीकरण करणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे नारायण राणेंचं भवितव्य अद्यापही अधांतरित असल्याचं दिसत आहे.
दरम्यान काँग्रेस सोडल्यापासून नारायण राणे अद्यापही भाजप प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. भाजपाकडून नारायण राणे यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली आहे. मात्र अद्याप अधिकृत प्रवेश देण्यात आलेला नाही. परंतु आता लवकरच नारायण राणे यांना भाजपात घेतलं जाईल असं बोललं जात आहे. परंतु शिवसेनेकडून राणे यांच्या प्रवेशाला विरोध आहे. त्यामुळे शिवेसना सहमत होईल का असं विचारलं असता त्यासाठी आम्ही प्रयत्न करु असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS