संभाजी भिडे गुरुजींना मुख्यमंत्र्यांकडून क्लिनचीट !

संभाजी भिडे गुरुजींना मुख्यमंत्र्यांकडून क्लिनचीट !

मुंबई – भीमा कोरेगावमध्ये घडलेल्या हिंसाचाराबाबत संभाजी भिडे गुरुजींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लिनचीट दिली आहे. संभाजी भिडे गुरुजींचा भीमा कोरेगाव घटनेत सहभाग नसून घटना घडली त्याच्या सहा महिने आधीही भीमा-कोरेगाव भागात भिडे गुरुजींचा संचार नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. तसेच याबाबत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना काल परिस्थिती समजावून सांगितली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आंबेडकर यांनी कालच्या बैठकीत फेसबुक पोस्टचे पुरावे दिले असून त्यांनी दिलेल्या पुराव्यावरून आठ दिवसात चौकशी करण्याचे आश्वासन त्यांना दिलं असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच या घटनेला कुणीही जबाबदार असले तरी त्यांना सोडणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं असून या घटनेशी प्रत्यक्ष संबंध तर सोडाच परंतु  दुरुनही संबंध आढळला तरी कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

 

COMMENTS