मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपचं अखेर ठरलं असून याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. लोकसभेच्या 25 जागा भाजप तर 23 जागा शिवसेना लढवणार आहे. युतीबाबत चर्चा करण्यासाठी विधानसभा निवडणुकीसाठी मित्र पक्षांशी चर्चा करुन त्यांना जागा दिल्यानंतर राहिलेल्या जागा भाजप आणि शिवसेना अर्ध्या अर्ध्या वाटून घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार प्रकल्प इतर ठिकाणी हलवला जाणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच तांत्रिक कारणामुळे ज्यांना कर्जमाफी मिळाली नाही त्या सर्वांना कर्जमाफी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असून राम मंदिरासाठी आणि शेतक-यांसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान लोकसभा, विधानसभा आणि सर्व निवडणुकीसाठी पुन्हा एकत्र आलो आहोत. जनभावनेचा आदर करुन एकत्र आलो असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS