मुंबई – राज्यात महाशिवआघाडीचं सरकार निश्चित झालं असून शिवसेनेनं राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह काही नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आपला पाठिंबा जाहीर केला असून याबाबतचं पत्र दोन्ही पक्षांनी पाठवलं आहे. त्यामुळे राज्यात गेल्या 19 दिवसांपासून सुरु असलेला सत्तासंघर्ष अखेर संपला आहे.
दरम्यान आज सकाळी झालेल्या काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्यामुळे राज्यातील 6 नेते दिल्लीला पोहोचले होते. या बैठकीत काँग्रेसनं अखेर पाठिंबा दिला आहे. शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शिवसेनेला समर्थनाचं पत्र राज्यपालांना पाठवलं आहे. त्यामुळे महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होण्याचा मार्ग अखेर मोकऴा झाला आहे.
असा आहे प्रस्ताव?
महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी 1-1 उपमुख्यमंत्री आणि 14-14 मंत्रीपद असा फॉर्म्युला तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तिन्ही पक्षांकडे मिळून 162 आमदारांचे संख्याबळ !
राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी 144 आमदारांची आवश्यकता आहे. शिवसेनेचे 56 आमदार आहेत, तर त्यांना 8 अपक्ष आणि इतर पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा आहे. असे मिळून शिवसेनेकडे 64 आमदारांचे संख्याबळ आहे. राष्ट्रवादीकडे 54 तर काँग्रेसकडे 44 आमदारांचे संख्याबळ आहे. तिन्ही पक्षांकडे मिळून 162 आमदारांचे संख्याबळ होत आहे.
COMMENTS