मुंबई – कोकणाला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवा प्लॅन तयार केला आहे. चक्रीवादळात नुकसान झालेल्या घरांवर पत्र्यांऐवजी सिमेंट स्लॅब टाकण्यात येणार आहे. तसेच, वीज पडून नुकसान टाळण्यासाठी लाइटनिंग अरेस्टर बसवण्यात येणार येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
जागतिक बँकेच्या सहाय्याने राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प (NCRMP) या अंतर्गत 397.97 कोटीची कामे किनारपट्टीवरील जिल्ह्यामध्ये सुरु आहेत. ती युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या नॅशनल सायक्लोन रिस्क मिटीगेशन प्रोजेक्ट, राज्य प्रकल्प अंमलबजावणी युनिट आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाची आढावा बैठक आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या प्रोजेक्ट अंतर्गत समुद्र किनाय्रावरील जिल्ह्यांच्या भूमिगत विद्युत वाहिन्यांची कामे करण्याला प्राधान्य देण्यावर भर दिला आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहर, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी शहर, पालघर जिल्ह्यातील सातपाडी येथील 203.77 कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे सर्व नियोजित भूमिगत विद्युत वाहिनी कराराला वेळेत पुरस्कार देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.
COMMENTS