मुंबई – काही दिवसांपूर्वीच वाहतुकीचे नियम मोडणा-यांची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची नावं समोर आली होती. त्यानंतर आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी देखील वाहतुकीचे नियम मोडले आहेत. वाहतुकीचे नियम मोडणा-यांच्या यादीत मुख्यमंत्री आणि परिवहनमंत्र्यांचं नाव आलं आहे. त्यामुळे नियब बनवणा-यांनीच नियम तोडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान याबाबत स्वतः परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कबुली दिली असून ई-चलनाच्या थकबाकीत मुख्यमंत्रीच नाही तर माझंही नाव आलं असून मात्र सध्या मी वाहन चालवत नाही. माझ्या घरचे वाहन चालवतात त्यामुळे घरच्यांकडून नियमाचे उल्लंघन झालं असेल असं रावते यांनी म्हटलं आहे.
COMMENTS