मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलं असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण कोरोनामुळे राज्यातील विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होणारी निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलली आहे. याच नऊ जागांपैकी एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडून जाणार होते. ही निवडणूकच पुढे ढकलल्यामुळे उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलं असल्याची चर्चा आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेला व्यक्ती जेव्हा मुख्यमंत्री अथवा मंत्रीपदाची शपथ घेतो, तेव्हा पुढील सहा महिन्याच्या आत त्या व्यक्तीला विधानसभा किंवा विधानपरिषदेचं सदस्य व्हावं लागतं. त्यामुळे 28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या उद्धव ठाकरे यांना 28 मे च्या आत विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडून जायचं आहे. परंतु राज्यातील विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होणारी निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलली आहे. याच नऊ जागांपैकी एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडून जाणार होते. ही निवडणूकच पुढे ढकलल्यामुळे उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलं असल्याची चर्चा आहे.
विधानपरिषदेवर जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यापुढे एक पर्याय आहे. विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त दोन जागा सध्या रिक्त आहेत. रामराव वडकुते यांनी राजीनामा दिल्याने एक जागा रिक्त झाली आहे. तर दुसरी जागा धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झाली आहे. या दोन पैकी एका जागेवर उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीची शिफारस राज्यपालांकडे केली जाऊ शकते. यातून उद्धव ठाकरे विधानपरिषदेचे आमदार होऊ शकतात. परंतु याचा कालावधी 6 जूनपर्यंतच असणार आहे. त्यामुळे 6 जूननंतर उद्धव ठाकरे यांना पुन्हा दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर जावं लागेल.
COMMENTS