मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच अजून कायम आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी न दिल्यामुळे राजकीय पेच निर्माण झाला आहे.
परंतु हा तिढा आता लवकरच सुटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलींद नार्वेकर यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली. त्यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून उद्धव ठाकरे यांना मंजुरी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान मोदी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली होती. यावेळी ठाकरे यांनी राज्यातल्या अनैतिक राजकारणाविषयी मोदींकडे तक्रार केल्याची माहिती आहे. त्यानंतर आज नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून उद्धव ठाकरे यांना मंजुरी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS