…त्यामुळे आम्ही रात्रीची कामे दिवसा करायला लागलो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला !

…त्यामुळे आम्ही रात्रीची कामे दिवसा करायला लागलो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला !

मुंबई – विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाची सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाने करण्यात आली. राज्यात 15 सप्टेंबरपासून ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान राबवले जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. गावागावात कोरोना दक्षता समिती स्थापण्यात येणार आहे. यामध्ये सर्व पक्षांचे कार्यकर्ते, नागरिक आदी आहेत. काही ठिकाणी अंमलबजावणी केली जात आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे आरोग्य सेवेवरील ताण कमी होईल. यामधील सुचनानुसार आवश्यक असेल तरच बाहेर पडा आदी सूचना आहेत. 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर एक मोहिम राबविणार आहोत. या काळात महाराष्ट्रातील एकही घर असे राहू द्यायचे नाही. आरोग्य टीमने प्रत्येक घरात जाऊन चौकशी करावी. डॉक्टर तपासणी करतील. य़ा पथकाने घराघरात जाऊन नागरिकांची चौकशी करावी, सुरुवातीला झोपडपट्टीमध्ये व्हायरस जाईल असे वाटले होते. पण आता गावागावात मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडू लागले आहेत.

तसेच या भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना अप्रत्यक्षरित्या अनेक टोले लगावले. येत्या काळात प्रत्येक पाऊल शांततेने उचलावं लागणार आहे, ओरडून बोलल्याने कोरोना होतो,
असे कालच वाचले. शॉर्टकट मारावे लागले की रात्री कामे करावी लागतात, आम्ही रात्रीची कामे दिवसा करायला लागलो, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

सर्व पक्षांनी विरोधी पक्षाने शासनाला सहकार्य केले याबद्दल मी धन्यवाद देतो. मी महाराष्ट्रातील जनतेला धन्यवाद देतो हे संकट म्हणजे विषाणूबरोबरचं युद्ध आहे. रुग्णसंख्येतील वाढ आपण मर्यादित ठेवली. राज्यात तीन लॅब होत्या. आता राज्यात 530 लॅब तयार झाल्या आहेत. राज्यातील गावागावात, घराघरात आरोग्य पथके जाणार असून तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये कायमस्वरुपी हॉस्पिटल उभारणार आहोत. कृषी उद्योगाकडेही लक्ष देणार, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

COMMENTS