मुंबई – महाविकासआघाडी सरकारनं फडणवीस सरकारच्या काळातील आणखी काही कामांना स्थगिती दिली आहे. मेट्रो कारशेड तसंच सिंचन प्रकल्पांना स्थगिती दिल्यानंतर आता भाजपा सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ग्रामीण भागातील विकासकामांचा यामध्ये समावेश असून यासाठी अनुदानही मिळालं होतं.
दरम्यान 2019-20 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या अद्याप कार्यारंभ आदेश देण्यात न आलेल्या या विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे. या कामांना दोन कोटींपासून ते 25 कोटींपर्यंत अनुदान मिळालं होतं. ज्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे त्यामध्ये ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरवणे, कोकण पर्यटन विकास कार्यक्रम, यात्रास्थळाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम, ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्राच्या विकास यांचा समावेश आहे.तसेच मागील सरकारच्या कार्यकाळातील इतरही आणखी काही कामांचा आढाव घेण्यात येत असल्याची माहिती आहे.
COMMENTS