नागपूर – भाजपचा शेतकऱ्यांचा कळवळा हा खोटा आहे. भाजपने उगाच इथे बोंबलू नये केंद्राकडे जाऊन पैसै मागावे असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. नागपूर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही भाजपनं सावरकरानंतर शेतकऱ्यांच्या मुद्यावरून विधानसभेत गदारोळ केला. भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये भर सभागृहातच हाणामारी झाल्याने वातावरण आणखी चिघळलं. नंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
दरम्यान हे या सरकारचं पाहिलं अधिवेशन आहे. सभागृहाचं कामकाज जग बघतं. माझी दोन्ही पक्षांना विनंती सभागृहाच्या इतिहासाला काळिमा फसू नका.फक्त विरोधी पक्ष आहे सत्तारूढ पक्षला काही देणं घेणं नाही हे चित्र उभे करण्याचा प्रयत्न होतोय. शेतकऱ्यांना वचन दिलंय ते आम्ही पाळणार. फक्त बोंबल्ल्याने प्रश्न मार्गी लागत नाहीत. विरोधकांनी इथे गळा मोकळा करण्यापेक्षा केंद्राकडे करा, हवं असल्यास घसा मोकळ्या करण्याच्या गोळ्या मी देतो असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
भाजपला तंगड्यात तंगडं घालण्याची सवय असून मला अनुभव नसल्यानेच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मला काहीही अनुभव नाही, त्यामुळे मी काय मार्गदर्शन करणार. मला अनुभव नसल्यानेच विरोधक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
भाजपा वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना तंगड्यात तंगडं घालण्याची सवय आहे. देशात जी परिस्थिती आहे ती पाहता आपल्या मतदारसंघात तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, असही उद्धव ठाकरे यांनी आमदारांना म्हटलं आहे.
COMMENTS