मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले आहेत.
वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक विभागातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे कुलगुरु व प्र. कुलगुरु या वैधानिक पदावरील नियुक्त अधिकाय्रांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे.
तसेच उच्चदाब वेतन प्रणाली योजना राबविण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी परवानगीची संख्या कमी करुन इज ऑफ डुईंग बिझनेसची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच ग्रामीण भागातील लाखो कुुुटुुंबियांना दारिद्र्य रेषेवर आणणाय्रा नव तेजस्विनी-महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्दम विकास प्रकल्पाला गती देण्यासाठी 523 कोटी निधी उभारण्यात येणार आहे. तर यासाठी आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीमार्फत सहाय्य केलं जाणार आहे.
COMMENTS