मुंबई – राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर परिसरात, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूरमध्ये जीवनावश्यक सेवा सोडून सर्व बंद ठेवणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. तसेच रेल्वे आणि बस शहराच्या वाहिन्या आहेत. ते बंद करणं सोपं आहे. पण त्या बंद झाल्यातर अत्यावश्यक सेवांवरही परिणाम होऊ शकतो. आरोग्य कर्मचाऱ्यांवरही, अन्य कर्मचाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. तुर्त या दोन सेवा बंद होणार नाहीत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान नाईलाजानं संपूर्ण जगाला आज घरात थांबण्याची वेळ आली आहे.खबरदारीचा उपाय घेण्यास सांगितलं जात आहे घरी राहा. संपूर्ण जग जगण्यासाठी न थांबता धडपडत असतं. तसेच खासगी क्षेत्रातील सर्व कंपन्या बंद ठेवण्याचा निर्णय आज घेतला आहे. त्यामुळे कंपन्यांनी हातावर पोट चालणाऱ्यांना किमान वेतन द्यावं. कंपन्यांच्या मालकांनी माणुसकी जपावी, असं आवाहनही त्यांनी केलं. ही फिरण्याची सुट्टी नाही. गर्दी कमी न झाल्याचं वाटल्यास नाईलाजानं रेल्वे बससेवा बंद करावी लागेल असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS