मुंबई – कोरोनामुळे मुंबई पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दोन पोलिसांच्या मृत्यूवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हळहळ व्यक्त केली आहे. आपल्यासाठी लढताना दोन पोलीस शहीद झाले आहेत. त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते करू, पण माणूस गेला आहे असं कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांनी मी आंदराजली वाहतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी
शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहिली आहे.
लॉकडाउनमुळे कोरोनाचा गुणाकार कमी करण्यात यशस्वी झालो आहोत. कोरोनाची वाढ आपण काही प्रमाणात नियंत्रणात ठेवली आहे. स्वतःचं घरदार स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवून, ते कोरोनाचं युद्ध आपल्यासाठी लढत आहेत. म्हणून पोलीस काय करत होते, असा संशय व्यक्त करण्यापेक्षा तत्कालीन स्थितीचा एकदा विचार करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
दरम्यान सध्या सण उत्सवाचा काळ आहे. पण, राज्यातील सर्व धर्मियांनी प्रचंड संयम दाखवला आहे. लॉकडाउनमुळे आपण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात काही प्रमाणात यश मिळवलं आहे. सगळ्यांनी सूचनाचं पालन केल्यामुळे कोरोनाची वाढ काही प्रमाणात नियंत्रित झाली. दुसरीकडं करोनाविरोधातील या लढ्यात डॉक्टरांसह आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि पोलीस आघाडीवर आहेत. डॉक्टरांसह पहिल्या फळीतील कर्मचारी आणि अधिकारी जिव धोक्यात घालून तणावाखाली काम करत आहेत, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे.
COMMENTS