शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा!

शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा!

नागपूर – राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे थकीत कर्ज माफ करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच गोरगरीबांसाठी 10 रुपयामध्ये शिवभोजन योजना सुरु करणार आहो. प्रायोगिक तत्वावर 50 ठिकाणी ही योजना सुरु करणार असल्याचं ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा केली आहे. तसेच विदर्भाचा विकास झालेला नाही, तुम्ही काम केलेलं नाही असं मी कुठेही म्हटलेलं नाही. विदर्भाचा मी नातू आहे. आजोळचे आशिर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. विदर्भाच्या विकासात कुठलीही कसूर ठेवणार नाही असही ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालय सुरु करणार. ते कार्यालय थेट मंत्रालयातील सीएमओ कार्यालयाला जोडलेलं असेल.विदर्भाच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीसजी मला तुमची मदत लागेल, विदर्भाचा तुमच्या इतका माझा अभ्यास नाही असंही सभागृहात उद्धव ठाकरे म्हणाले.

कर्जमाफीच्या घोषणेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणेचा निषेध करुन सभात्याग केला. उद्धव ठाकरे सातबारा कोरा करणार म्हणाले होते. मग आता दोन लाखापर्यंत कर्जमाफी का दिली ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

COMMENTS