राज्यात लॉकडाऊन कायम, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा!

राज्यात लॉकडाऊन कायम, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा!

मुंबई – महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यात आत्तापर्यंत 33 हजार तर मुंबईत 19 हजार चाचण्या झाल्या आहेत. यातल्या 60 ते 70 टक्के लोकांमध्ये सौम्य ते अती सौम्य लक्षणे असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच शक्यतोवर घरातून बाहेर पडूच नका आणि काही कामांसाठी बाहेर पडलात तर मास्क बांधा आणि काळजी घ्या असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

दरम्यान महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे हे तर खरं आहे. पुण्यात सुरुवात झाली, मुंबईत रुग्ण वाढलेत. कारण मुंबई हे जगाचं प्रवेशद्वार आहे. आपण तपासण्या सुरु केल्या तेव्हा केंद्राकडून आलेल्या यादीतल्या देशांना बंदी होती. मात्र जे देश यादीत नव्हते त्यातले रुग्ण मिसळले. आता मुंबईत ज्या ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत ते भाग सील केले आहेत. जे रुग्ण आपल्याला सापडलेत त्याची तपासणी महापालिका घरोघरी जाऊन करत असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS