मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच येणार समोरासमोर!

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच येणार समोरासमोर!

मुंबई – मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी पंतप्रधान मोदी उद्या दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी पुणे विमानतळावर राजशिष्टाचारानुसार त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी गृहमंत्री अमित शाह तीन दिवस पुण्यात असणार असल्याची माहिती आहे.  विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देखील उद्या पुण्यात असल्याची माहिती आहे.

दरम्यान शिवसेना-भाजपने एकत्रित येऊन विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत महायुतीला चांगल्या जागाही मिळाल्या. परंतु मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्ष वेगळे झाले. कालानंतर भाजपाची साथ सोडत शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केलं. या सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. राज्यात महाविकासआघाडीने सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी राज्यात येत आहेत. पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी पंतप्रधान मोदी उद्या दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी पुणे विमानतळावर राजशिष्टाचारानुसार त्यांचं स्वागत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. त्यामुळे या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS