मुंबई : औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्यावतीने औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याची मागणी करण्यात आली. काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या ट्विटर हॅन्डलवरून औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला होता. त्यावर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी इशारा दिला होता. तर आज पुन्हा सीएमओच्या ट्विटर हॅन्डलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा नामोल्लेख संभाजीनगर असा केला आहे.
आज मुख्यमंत्रींच्या कार्यालयाच्या ट्विटरवरुन म्हटलं आहे की, काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील नियमित न झालेल्या गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. मी काही दिवसांपूर्वी संभाजीनगरवासीयांना याविषयी आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता केली आहे. त्यामुळे संभाजीनगर सारख्या मराठवाड्याच्या राजधानी शहरातील सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार होणार असून उत्तम रितीने नागरीकरण होऊ शकेल. यापुढे देखील असे जनहिताचे निर्णय घेण्यात येतील त्याकरिता आपले सहकार्य आणि प्रेम असेच राहू द्या, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे
त्यामुळे संभाजीनगर सारख्या मराठवाड्याच्या राजधानी शहरातील सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार होणार असून उत्तम रितीने नागरीकरण होऊ शकेल. यापुढे देखील असे जनहिताचे निर्णय घेण्यात येतील त्याकरिता आपले सहकार्य आणि प्रेम असेच राहू द्या."
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 7, 2021
COMMENTS