पुरानं वेढलेलं गाव जलयुक्त मुळे टँकरमुक्त, सीएम साहेब लॉजिकली तरी हे पटत नाही !

पुरानं वेढलेलं गाव जलयुक्त मुळे टँकरमुक्त, सीएम साहेब लॉजिकली तरी हे पटत नाही !

गेल्या महिन्यात म्हणज्येच 16 आणि 17 ऑगस्टला यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला होता. मुसळधार पावसामुळे आर्णी तालुक्यातील काही गावांना पुराचा वेढा पडला होता. त्यामुळे त्यांचा संपर्कही तुटला होता. महापुराने वेढलेल्या गावामध्ये आर्णी तालुक्यातील जवळा या गावचाही समावेश होता. मात्र काल मुख्यमंत्र्यांनी ते जवळा गाव जलयुक्त शिवारमुळे टँकर मुक्त झाल्याचा दावा केला आहे. तसं ट्विट त्यांनी केलं आहे.

जलयुक्त शिवारची कामं जवळा गावात झालीही असतील. पण जर 20 दिवसांपूर्वी एखाद्या गावात एवढा पाऊस पडला की त्या गावाला पुरानं वेढलं आणि त्या गावचा इतर भागाशी संपर्क तुटला असेल. तर ते गाव केवळ जलयुक्त शिवारमुळे टँकरमुक्त झालं असं म्हणणं नक्कीच हास्यास्पद होईल. लॉजिकली तरी हे पटत नाही.

COMMENTS