पुणे – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांच्याविरोधात वाकड पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान निलेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुटुंबीयांवर जोरदार टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. त्यानंत काल झालेल्या सभेतही निलेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांवर टीका केली आहे. राणेंच्या नादाला लागायचे नाही. खालच्या दर्जाची टीका कोणावर करता एका माजी मुख्यमंत्र्यावर? आम्ही कधी बाळासाहेबांवर बोललो नव्हतो. मानसन्मान करायचा असतो. तुम्ही माजी मुख्यमंत्र्यांबाबत बोलता मग आम्ही बाळासाहेबांबद्दल बोलायचे नाही काय? अरे तुझा देव तुझ्या देव्हा-यात ठेव माझा देव माझ्या देव्हा-यात ठेवीन. ठाकरेंची अब्रु परत रस्त्यावर काढीन, आमच्या नादाला लागायचे नाही असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे. यानंतर निलेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेनं गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS