मुंबई – गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांचा राजीनामा ताबडतोब घेतला पाहिजे. ठाकरे साहेब ते राम मंदिर तुमच्या कडून होणार नाही पण निदान केसरकरसारख्या तुमच्या रावणांचा तरी बंदोबस्त तुम्ही करणार की नाही असा सवाल माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. याबाबतचं ट्वीट निलेश राणे यांनी केलं असून यामध्ये त्यांनी दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
केसरकारांचा राजीनामा ताबडतोप घेतला पाहिजे. ठाकरे साहेब ते राम मंदिर तुमच्या कडून होणार नाही पण निदान केसरकर सारख्या तुमच्या रावणांचा तरी बंदोबस्त तुम्ही करणार की नाही??? https://t.co/wbovkc8tgN
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 10, 2018
दरम्यान बलात्कारपीडित मायलेकी आपले गाऱ्हाणे घेऊन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांना भेटण्यासाठी मंत्रालयात गेल्या असता केसरकर यांनी हाकलून दिल्याचा आरोप या पीडित महिलांनी केला आहे. या प्रकरणी केसरकर यांच्याविरोधात मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. केसरकर यांनी, ‘तुमची लायकी काय आहे, जास्त बोलायचे नाही’, असे म्हणत दालनातून हाकलून दिल्याचे या महिलांनी म्हटलं आहे.
दरम्यान या मायलेकींवर मे २०१७मध्ये सामूहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी दीड महिन्यानंतर तक्रार नोंदवली. पण स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे सात आरोपींपैकी एकावरच गुन्हा दाखल केला होता. आता आरोपींकडून गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावले जात असून, न्याय मिळण्यासाठी पुन्हा केसरकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न या महिलांनी केला होता. परंतु केसरकर यांनी त्यांना न्याय देण्याऐवजी हाकलून दिल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे.
यावरुन निलेश राणे यांनी केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली असून केसरकर यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.
COMMENTS