नवी दिल्ली – देशभरात भाजप आणि काँग्रेस हे एकमेकांचे कट्टर विरोधक असल्याचं पहावयास मिळालं आहे. परंतु हेच कट्टर विरोधक मिझोरममध्ये सत्तेसाठी एकत्र आले आहेत. मिझोरममधील चकमा स्वायत्त जिल्हा परिषदेत सत्तेसाठी भाजपा व काँग्रेस यांनी हातमिळवणी केली आहे. स्वायत्त परिषदेच्या २० जागांपैकी काँग्रेसला सहा तर भाजपला पाच जागा मिळाल्या आहेत. तर मिझो नॅशनल फ्रंटने आठ जागा मिळवल्या. त्यामुळे निकालानंतर काँग्रेस व भाजपाने एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे क्रीडामंत्री व काँग्रेस नेते झोडिंतुलंगा यांनी दिली आहे.
दरम्यान राज्य भाजपा नेतृत्व मात्र या आघाडीबाबत नाराज असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसबरोबर आघाडी करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांवर भाजपा कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत पक्षनेतृत्व दिल्ली किंवा गुवाहाटीहून आदेशाची प्रतीक्षा असल्याचे भाजपाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या युतीचा परिणाम राष्ट्रीय स्तरावर किंवा आगामी विधानसभा निवडणुकीवर होणार नसल्याचं दिसून येत आहे. याबाबतची बातमी business-standard.com ने दिली आहे.
COMMENTS