आघाडीत सहभागी होण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रकाश आंबेडकरांना लेखी पत्र !

आघाडीत सहभागी होण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रकाश आंबेडकरांना लेखी पत्र !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्रित घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीनं आघाडीची स्थापना केली आहे. परंतु भारिपचे प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना काही जागांवरुन आडून बसले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांना आघाडीत सहभागी करुन घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत. आघाडीत सहभागी होण्यासाठी पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं प्रकाश आंबेडकरांना साकडे घातले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीनं आंबेडकरांना लेखी पत्र लिहिले असून अटी मान्य असल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. आरएसएसला संविधानाच्या चौकटीत बसवण्याची मागणी मान्य असल्याचाही पत्रात उल्लेख आहे. तसेच आरएसएसला संविधानाच्या चौकटीत बसवण्याबाबतचा मसुदा आंबेडकरांनी तयार करावा असंही या पत्रात म्हटलं आहे. आंबेडकर हे स्वतः कायदेतज्ज्ञ आहेत, त्यामुळे त्यांनी मसुदा तयार करावा अशी पत्रात विनंती करण्यात आली आ.

तसेच आंबेडकरांनी तयार केलेला मसुदा सगळे पक्ष मान्य करतील, असं आश्वासनही या पत्रात काँग्रेसकडून विखे पाटील आणि राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे आता याबाबत प्रकाश आंबेडकर हे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS