काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, ‘या’ मतदारसंघातील उमेदवार बदलला!

काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, ‘या’ मतदारसंघातील उमेदवार बदलला!

मुंबई – काँग्रेसनं काल चौथी यादी जाहीर केल्यानंतर आज उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून कुडाळ मतदारसंघातील उमेदवार बदलण्यात आला आहे. काँग्रेसकडून राघोबा कुडाळकर यांच्या जागी चेतन मोंडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पाचव्या यादीतील काँग्रेस उमेदवारांची नावे

मुखेड – भाऊसाहेब पाटील

पालघर (ST)- योगेश नाम

कुडाळ – चेतन मोंडकर

नांदेड दक्षिण – मोहनराव माणिकराव हंबार्डे

भिवंडी पूर्व – संतोष शेट्टी

दरम्यान आतापर्यंत काँग्रेसच्या पाच याद्या जाहीर झाल्या आहेत. काँग्रेसने पहिल्या यादीत ५१, दुसऱ्या यादीत ५२, तिसऱ्या यादीत २०, चौथ्या यादीत १९ तर पाचव्या यादीत पाच उमेदवारांची नावा जाहीर करण्यात आली आहेत.

दरम्यान काल काँग्रेसनं उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली होती. या यादीत एकूण 19 जणांना उमेदवारी देण्यात आली होती. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आशिष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आशिष देशमुख विरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. तसेच राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके यांना काँग्रेसकडून अमरावतीतून उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसने जाहीर केलेल्या चौथ्या यादीत कणकवली मतदारसंघातून सुशिल राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

COMMENTS