नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंत काँग्रेसला धक्के बसत आहेत. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर आता कर्नाटकात राजकीय भूकंप होणार असल्याचं दिसत आहे. याठिकाणी काँग्रेसचे ८ तर जेडीएसचे ३ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. जर १२ आमदारांनी राजीनामे सोपवले तर हे सरकार अल्पमतात येऊ शकते. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान कर्नाटकात भाजपाने सर्वात जास्त म्हणजेच १०४ जागा मिळवल्या. मात्र पूर्ण बहुमत नसल्याने सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपाला सत्ता काबीज करता आली नाही. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस एकत्र आले. जेडीएसचे कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. मात्र आता सत्तेतल्या दोन पक्षांमधलेच १२ आमदार राजीनाम्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS