मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये जागावाटवापरुन अजूनही चर्चा सुरु आहे. काही जागांचा तिढा सुटला असल्याची माहिती आहे तर काही जागांवर सकारात्मक चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्वाधिक चर्चेत असलेल्या अहमदनगरच्या जागेचा तिढा अखेर सुटला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही जागा मिळवण्यात काँग्रेसला यश आलं असून राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे हे याठिकाणाहून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान याबाबत 15 जानेवारीला दिल्लीत आघाडी नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत याबाबतची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच
रत्नागिरी आणि पुण्याची जागा काँग्रेसकडे राहणार असून नंदुरबारची जागा आपल्याला देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कोट्यातली अहमदनगरची जागा काँग्रेसला देण्याची तयारी राष्ट्रवादीने केली असून त्याबदल्यात काँग्रेस कोट्यातली औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता 15 जानेवारीला होणा-या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS