नवी दिल्ली – आंदोलक शेतक-यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधराचा वापर केला. याचे पडसाद देशभरात उमटले असून याबाबत भाजप सरकारवर जोरदार टीका राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून केली जात आहे. मर जवान, मर किसान हीच मोदी सरकारची मानसिकता असून गांधी जयंतीच्या दिवशी अहिंसेचे भान न ठेवता शेतकऱ्यांवर अश्रुधूर आणि लाठीचार्ज केला गेला. त्यामुळे भाजपाचा हिंसक चेहरा समोर आला, अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे.
एक तर भाजप-शिवसेनेचे सरकार शेतकर्यांना न्याय देत नाही आणि दाद मागण्यासाठी मोर्चा काढला तर बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जातो. बळीराजाला आता न्याय मागण्याचाही अधिकार राहिलेला नाही का?
या सरकारचा करावा तेवढा निषेध कमीच ठरेल…https://t.co/7Xpp9QoerR— R Vikhe Patil (@RVikhePatil) October 2, 2018
या घटनेनंतर काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपावर टीका केली. हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तर राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. ‘किसान क्रांती पदयात्रा’ दिल्लीमध्ये अडवण्यात आली. गांधी जयंतीच्या दिवशी अहिंसेचे भान न ठेवता शेतकऱ्यांवर अश्रुधूर आणि लाठीचार्ज केला गेला. त्यामुळे भाजपाचा हिंसक चेहरा समोर आलेला आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. असं मलिक यांनी म्हटलं आहे.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारची भूमिका शेतकरी विरोधी आहे. त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. न्याय मागण्यासाठी आलेल्या शेतकर्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न दिसतोय. सरकारला अपयश समोर दिसतंय त्यातून वैफल्य आलं असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे, पिकाला हमीभाव देत नाही, खोटी आश्वासने देत भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील
शेतकऱ्यांना हमीभाव दिला नाही,नुसता घोषणा आज शेतकरी दिल्लीत येऊन जाब विचारतत त्यांच्यावर अश्रूधुर सोडलं, लाठ्या दिल्या. शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतक-यांच्या विरोधात सरकार मोर्चावर अतिरेकी कारवाई केली. शेतकरी मोदींच्या दडपशाहिला घाबरणार नाही.
अशोक चव्हाण
महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी शेतक-यांवर लाठीहल्ला केला जातो.गांधीजींच्या अहिंसेच्या विचाराला पुढे नेण्यासाठी एकीकडे काँग्रेस सेवाग्राममध्ये कार्यक्रम करतो आहे. मात्र केवळ फोटो काढण्यासाठी गांधी जयंती साजरी करणार्या लोकांनी शेतक-यांवर लाठीहल्ला केला, आज त्यांचे पितळ उघडे पडले असल्याचं चव्हाणांनी म्हटलं आहे.
COMMENTS