विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मतभेद, पक्षातील वरिष्ठ नेते नाराज!

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मतभेद, पक्षातील वरिष्ठ नेते नाराज!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील अनेक नेते पक्ष सोडून गेले आहेत. तर आणखी काही नेते पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. अशातच काँग्रेसमधील वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती आहे. नाना पटोले यांच्या ‘पोल खोल’ यात्रेवरुन पक्षात नाराजी असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता या यात्रेचं आयोजन केल्यामुळे काँग्रेस नेते नाराजी असल्याची माहिती आहे. त्यामुळे या नाराजीचा फटका काँग्रेसला बसू शकतो असं बोललं जात आहे.

दरम्यान नाना पटोले यांनी लोकसभा निवडणुकीआधीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी पोलखोल यात्रेचं आयोजन केले. या यात्रेद्वारे त्यांनी सरकारची पोलखोल करणार असल्याचं म्हटलं आहे. परंतु या यात्रेच्या नियोजनात काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांना विचारले नाही, प्रचाराबाबत अजून ठोस कार्यक्रम नाही, त्यामुळे ही नाराजी असल्याचं समोर आलं आहे.

तसेच नाना पटोले काँग्रेसच्या कॅम्पेन कमिटीचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्यांची कार्यपद्धती काँग्रेसमधील नेत्यांना पटत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जोरदार फटका बसला आहे. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील अंतर्गत नाराजी वाढत असल्याचं दिसत आहे. या नाराजीचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू शकतो असं बोललं जात आहे.

COMMENTS