मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसने विखे-पाटील यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे.तर विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या गटनेतेपदी निवड केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी ही यादी जाहीर केली आहे.
दरम्यान वेणूगोपाल आणि थोरात यांच्यासह इतरही काही नेत्यांवर पक्षाकडून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये आमदार नसीम खान यांच्याकडे विधानसभा उपनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर बसवराज पाटील यांची मुख्य प्रतोदपदी तर के.सी. पाडवी, सुनील केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे यांची विधानसभेच्या प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या गटनेतेपदी शरद रणपिसे यांची तर उपनेतेपदी रामहरी रुपनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या प्रतोदपदी भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
COMMENTS