मुुंबई – लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असताना काँग्रेसला एक मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा मुलगा शंभूराजे जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रविवारी त्यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.
काल करमाळ्यात भाजपचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शंभूराजे यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजेंद्र राऊत उपस्थित होते.
दरम्यान करमाळा तालुका हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आता शंभूराजे जगताप यांच्या भाजप प्रवेशाने आघाडीचे करमाळ्यात मोठे नुकसान झाले आहे. तसेच शंभूराजे यांच्या पक्षप्रवेशाचा भाजपाला माढा लोकसभा मतदारसंघात मोठा फायदा होणार आहे. करमाळा शहर व तालुक्यात जगताप यांची मोठी ताकद आहे. करमाळा नगरपालिका आज त्यांच्याच ताब्यात असून नगराध्यक्षपद जगताप यांच्या दुसऱ्या मुलाकडे त्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
ी
COMMENTS